सह्याद्री चौफेर | राजू डावे
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. या मोर्चात राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये ईलेक्ट्रक वोटींग मशिनचा वापर न करता, निवडणुका ह्या पारदर्शक पध्दतीने बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, वणी विधानसभा क्षेत्रातील मागील १० वर्षात आर. व्ही. उंबरकर या कन्स्ट्रक्शन्स कंपनीने प्रधानमत्री सडक योजना व इतर योजनेतील सा. बां. विभाग पांढरकवडाकडुन स्वत: व सबलेटेड टेंडर घेवुन बांधकाम केलेल्या सर्व रस्त्यांचे टेक्नीकली ऑडीट करण्यात यावे, सर्व निराधारांना मासिक अनुदान भत्ता हा वाढत्या महागाई नुसार ५ हजार रूपये करण्या यावा, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लागणारी उत्पन्नाची अट २१ हजार रूपयावरून १ लाखांपर्यंत करण्यात यावी, निराधार लाभार्थ्यांची वय मर्यादा ६० वर्ष करण्यात यावे, सर्व दिव्यांग निराधार व्यक्तींना उद्योगासाठी २ लाखचे कर्ज अनुदान म्हणुन देण्यात यावे, शेतक-यांच्या कापसाला किमान १२ हजार रूपये तर सोयाबिन ला ८ हजार प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व शेतक-यांना सरसकट पिकविमा योजनेचा लाभ देण्यात यावा, नागपुर ते मुंबई नंदिग्राम ऐक्सप्रेस तात्काळ पुर्ववत सुरू करण्यात यावी, सर्व सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना शासकी नौकरी मिळेपर्यंत १० हजार रूपये मासिक अनुदान भत्ता देण्यात यावा, शासकीय यंत्रनेचे खासगीकरण तात्कळा थांबविण्यात यावे व सर्व स्पर्धा परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात याव्यात, वणी येथिल कोलडेपो, कोल वॉशरीज कोळसा साईडींगमुळे मोठ्या प्रमाणाीत प्रदुषन वाढले असुन मानवी स्वास गुदमरल्या जात आहे. तरी कोलडेपो, कोल वॉशरीज कोळसा साईडींग तात्काळ मानवी वस्तीच्या ५ किलो मिटर अंतरावर हटविण्यात यावे, राज्यात दलीत समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार तात्काळ थांबविण्यात यावे व अॅट्रासिटी कायदा आनखी सक्त करण्यात यावा, वणी वेकोली क्षेत्रातील सर्व खासगी कंपण्यामध्ये व मुकूटबन येथिल सिमेंट प्लॉट येथे स्थानिक बेरोजगरांना ८० टक्के रोजगार देण्यात यावा, दिलीप भोयर यांचेवर रस्ता बांधकाम ठेकेदार उंबरकर यांनी खोटी तकार देवुन गुन्हा नोंद केला आहे. त्याची योग्य चौकशी करून तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशा विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांचे हस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविण्यात आले आहे.
एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलीप भोयर यांनी दिला आहे. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व हजारों नागरिक सहभागी झाले होते.
मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार - दिलीप भोयर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 15, 2023
Rating: