काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाला यश : मारेगाव तालुक्यात 132 KV उपकेंद्र होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : काँग्रेस नेते वामनराव कासावार व माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटी चे मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृ.ऊ.बा. समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा, ग्रामपंचायत सदस्य अंकुश माफूर व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बदकी यांच्या सामूहिक आमरण उपोषणाने मारेगाव तालुक्यातील 132 (KV) केव्हीचा प्रलंबित प्रस्ताव अखेर मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस च्या उपोषणाला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे.

गेल्या अनेक वर्षा पासून मारेगाव तालुक्यात विजेची मोठी समस्या निर्माण झाली होती. विजेचा लपंडाव व अघोषित लोडशेडींग मुळे विज ग्राहक,शेतकरी व छोटे-मोठे व्यावसायिकदार पुरता कंटाळलेला असताना मारेगाव तालुका काँग्रेस च्या वतीने (ता.23) ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.

या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी उपविभाग मारेगाव यांच्याकडून लिखित आश्वासन देण्यात आले होते. आश्वासनानुसार मारेगाव तालुक्यासाठी 132 (KV) केव्ही उपकेंद्र मिळावे या बाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करण्यात आला आहे. अशी माहिती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली.

मारेगाव तालुक्याला सतत भेडसावणाऱ्या विजेच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने आमरण उपोषणाचे हत्यार उपासले होते. महावितरण कपंनीच्या उप अभियंता पाटील यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (ता.25) ऑक्टोबरला उपोषण मंडपी भेट देत तोडगा काढला होता,परंतु लेखी आश्वासनाशिवाय आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नाही, अशी उपोषणकर्त्यानी ठाम भूमिका घेतल्यामुळे अखेर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे उपकेंद्राचा प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करण्यात आला आहे. विज ग्राहक तथा शेतकऱ्यांना या होणाऱ्या उपकेंद्राचा मोठा फायदा होणार असून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांनी महावितरण कपंनीचे मनःपूर्वक आभार मानले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाला यश : मारेगाव तालुक्यात 132 KV उपकेंद्र होणार काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाला यश : मारेगाव तालुक्यात 132 KV उपकेंद्र होणार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.