माधव कोहळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बीजेपीत प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी माजी मंत्री हंसराज अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष राजु डांगे, जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश सदस्य विजयबाबू चोरडीया, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहीत राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत आदिवासी गोंड गोवारी आरक्षण समितीचे अध्यक्ष माधवराव कोहळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
       
यावेळी भाजपा मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अविनाश लांबट, प्रशात नांदे, जिल्हा युवा मोर्चा सचिव प्रसाद ढवस, यांचे सह या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने आदिवासी गोंड गोवारी बांधव तथा भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माधव कोहळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बीजेपीत प्रवेश माधव कोहळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बीजेपीत प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on November 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.