सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा वर्ल्डकप चा अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा मार्डी येथील आठवडी बाजार चौकात मोठ्या पडद्यावर येथील युवा क्रिकेटप्रेमीनी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे तालुक्यातील क्रिकेटप्रेमिना 8 बाय 12 च्या मोठ्या पडद्यावर अंतिम सामन्याचा थरार पाहवयास मिळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा या वर्ल्डकप मधील फॉर्म बघता 1983 व 2011 नंतर तिसऱ्यांदा क्रिकेटचे विश्वविजेतेपदला गवसणी घालण्याची शक्यता असल्याने येथील क्रिकेटप्रेमीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल मोठा उत्साह वाढला आहे.
मार्डी येथील युवकांनी आठवडी बाजारातील चौकात 8 बाय 12 च्या मोठ्या स्क्रिन ची व्यवस्था करण्यात आली आहे. या होणाऱ्या वर्ल्डकप फायनलचा थरार पाहण्यासाठी परिसरातील क्रिकेटप्रेमिनी मार्डीत यावे असे आवाहन सरपंच रविराज चंदनखेडे यांनी केले आहे.