टॉप बातम्या

मुकुटबन येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : कठीण प्रसंगात आजारी रुग्णांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याकरिता अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे.अश्यातच डोळ्यांचे आजार आणि मोतीबिंदूचा त्रास असणा-या गरीब गरजू रुग्णांना उपचाराकरिता शहरातील मोठ्या दवाखाण्यात उपचार घेणं अवघड आणि जिकरीचे झाले आहे.
अश्यातच गरीब गरजूवंतांना मदतीचा हात पुढे करत स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन, वणी या सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम यांच्या सहकार्याने मुकुटबन  येथे डोळ्यांचे आजार असणा-या रुग्णांकरिता मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांकरिता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रविवार दि.19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत श्री राजेश्वर शिव मंदिर,बस स्टॅन्ड चौक मुकुटबन येथे संपन्न होणार आहे. या आधी ही श्री चोरडिया यांनी वणी,मारेगाव, कायर, येथील गरजू लोकांकरिता मोफत शिबीर राबवून हजारों नागरिकांना उपचार दिला, शिवाय डोळ्यांना प्रकाशही दिला आहे. ते वणी उपविभागासाठी सतत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. नुकताच त्यांना लोकमत आय कॉन (LOKMAT ICON) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यासह वणी मारेगाव झरी तालुक्यासाठी ही सन्मानाची बाब आहे.
आता पुन्हा त्यांनी भव्य मोफत शिबीर राबविण्याचा संकल्प केला असून मुकुटबन येथील शिबिरात लाभ घेणाऱ्याना मोफत औषधी देण्यात येणार आहे व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा केले जातील, तपासणी केल्यानंतर आवश्यक सर्व रुग्णांना चष्मे मोफत देण्यात येईल तसेच नोंदणी न झालेल्या रुग्णांचीही वेळेवर नोंदणी करुन तपासणी केल्या जाईल. अशी माहिती श्री चोरडिया यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. 
दरम्यान, होणाऱ्या शिबिरात झरी तालुक्यातील गरजूवंतांनी लाभ घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व समाज सेवा हिच ईश्वर सेवा, फाउंडेशन वणी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post