सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी शहरात दीपोत्सव दिवाळी निमित्त गायनाचा कार्यक्रम दर वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र आणि जैताई माता देवास्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव 2023 चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भावगीत, भक्तीगीत, सिनेगीत, अशा वेगवेगळ्या मराठी हिंदी गीतांचा आस्वाद श्रोत्यांना घेता येणार असुन, कार्यक्रमाचे सादरीकरण श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी द्वारा करण्यात येत आहे.