हाता-पायांना मुंग्या येतात ? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते मुंग्या येण्याची समस्या..! अशी करा दूर..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हाता-पायांना मुंग्या येतात? काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते मुंग्या येण्याची समस्या. मग तुम्हालाही हाता-पायांना वारंवार मुंग्या येतात का? जर तुमचं उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) ची कमतरता असते तेव्हा अनेक न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू लागतात. त्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, थकवा येणे, नैराश्य, पायांमध्ये पॅरेस्थेसिया आणि स्नायूंची जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या मुख्यतः मज्जातंतूशी संबंधित आहे. ज्यामुळे स्नायू आणि नसा कमकुवत होऊ शकतात. यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात.
हाता-पायांना मुंग्या फक्त व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे येतात का?
अनेक अहवालांमध्ये असे समोर आले आहे की, हात आणि पायांना मुंग्या या केवळ व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळेच नाही तर इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील येऊ शकतात. तुम्ही जर योग्य आहार घेतला नसेल तर शरीरात जीवनसत्वाची कमतरता जाणवते. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आतड्यांमध्ये जीवनसत्त्वं नीट पोहोचत नाहीत. त्यांच्यात या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय खावे?
● शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, मांस, मासे आणि अंडी खा.
● व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूध, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने देखील दूर केली जाऊ शकते.
● आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढता येते.
● भरड धान्य खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 देखील पुरेशा प्रमाणात मिळते.

हाता-पायांना मुंग्या येतात ? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते मुंग्या येण्याची समस्या..! अशी करा दूर.. हाता-पायांना मुंग्या येतात ? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते मुंग्या येण्याची समस्या..! अशी करा दूर.. Reviewed by सह्याद्री चौफेर on November 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.