सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. सकाळी 9:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'प्रेरणास्थळ' येथे प्रार्थना सभा आयोजित केली आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रेरणास्थळावरील या कार्यक्रमानंतर सकाळी 11:30 वाजता ते नागपूरकडे रवाना होतील.