सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भारत सरकारच्या खेळ व क्रीडा युवा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद निवडणूक घेण्यात आली होती,त्यात स्वाती ठेंगणे यांनी सांस्कृतिक मंत्री पदासाठी अर्ज केला व त्यासाठी जोमाने प्रचार प्रसार करून आता पर्यंत केलेले किर्तन, श्रीमद भागवत कथा, व आधार बहुद्देशीय सेवा संस्था, मारेगाव व नेहरू युवा केंद्र, यवतमाळचा माध्यमातून सामाजिक कार्यची उजाळणी मतदात्या वर्गाला करून देत मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या उपस्थितीत राज्यस्तरीय व पुढे दिल्ली येथे मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा मुख्य उपस्थितीत राष्ट्रीय "माझी माती माझा देश कार्यक्रम" समारोपात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून सक्रिय सहभाग घेतला आणि आता पुन्हा राज्यस्तरीय युवा संसद यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून २६४२ मतदान झाले यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातून स्वाती ठेंगणे ही निवडणुकीसाठी उभी होती, त्यांच्या विरुद्ध इतर उमेदवार रिंगणात उभे होते. या निवडणुकीत महाराष्ट्रामधून
प्रचंड बहुमतांनी निवडून आले आहेत.
युवा संसद 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्री कार्यपद भूषविणार आहे, त्यांना नेहरू युवा केंद्र यवतमाळच्या जिल्हा युवा अधिकारी श्री.सारंग मेश्राम व ढेंगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य युवा संसद 2023 सांस्कृतिक मंत्रीपदी कु.स्वाती किशोर ठेंगणे यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2023
Rating: