गळाफास, विहिरीत उडी या सारख्या आत्महत्येच्या घटनेने मारेगाव तालुक्यात व्यक्त होताहेत हळहळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वात मोठा सण दिवाळी. हा सण सर्वत्र साजरा होत असताना तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, काल मारेगाव शहरात आणि आज सोमवार ला म्हैसदोडका येथील घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. म्हैसदोडका येथील संगीता रोहिदास हेपट (45) नामक महिलेने एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आज सोमवार ला सकाळी 8 वाजता आपली जीवनयात्रा संपविली.
तर काल मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील सैफ अली मन्सूर अली सय्यद (20) वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आज पुन्हा मैसदोडका येथे एका घटस्फोटीत महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतक महिला वडीलाकडे राहत होती, असे समजते. तिला एक मुलगा आहे. तूर्तास संगीता यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.