सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी आश्रम शाळा काढल्या, परंतु ह्या शाळा विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे.
दरवर्षी अनेक विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी व शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडत आहेत पण प्रकल्प कार्यालयामधील अधिकारी व संस्थाचालक मलिंदा खाण्यात मग्न आहेत.
लोहारा ता.जि.यवतमाळ येथील जवाहर अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग 9 वी मध्ये शिकणारी आदिवासी विद्यार्थिनी कु. तनिष्का विजय जगदळ हिचा दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी संशयास्पद मृत्यू झाला. सदर विद्यार्थिनीला अत्यावस्त अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर प्रकरण दडपण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने पीडित मुलीच्या आईला विद्यार्थिनीला भेटू दिले नाही तसेच मयत मुलीचे शवविच्छेदनही केले नाही.
मुलीची आई पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता गेली असता तिची तक्रारही घेण्यात आली नाही. वरील सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने बिरसा क्रांतीदल जिल्हाध्यक्ष राहुल सोयाम यांनी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा आणि जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. परंतु प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांनी थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने दोषी कर्मचारी व शालेय प्रशासन यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पासून पीडित मुलीच्या आईसह प्रकल्प कार्यालय पांढरकवडा समोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
आदिवासी संघटना बसणार प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाला - राहुल सोयाम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2023
Rating: