सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
मार्डी : येथील द्वितीय नागरिक व ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुधाकर महादेव डाहुले (ता.वणी) यांचे आज बुधवारी (ता. ४) ला सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे ६४ वर्षचे होते. त्यांच्या निधनाने डाहुले परिवार आणि मार्डी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन-जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज बुधवारी वणी येथील मोक्षधाम वर दुपारी ३.३० वा. होणार आहे.