सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
तालुक्यातील महावितरणच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त असून पाऊस उशिरा आल्यानंतर अतिवृष्टी नंतर पावसाचा खंड, यामुळे आधीच शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यातच काही पाणी असणारे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढत असते हे माहीत असताना सुद्धा महावितरण ऑक्टोबर महिन्यात विजेचा पुरवठा सुरळीत करत नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे विद्युत वितरण साहित्य वापरल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो अपुरे मनुष्यबळ वापरून कंत्राटी लोकांच्या हातात वीज वितरण व्यवस्था दिलेली आहे. खैरगाव देशमुख, मोरवा, वागदा येथील शेतकरी मागील महिन्याभर पासून विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद असते आणि त्यानंतर आलेली विजसुद्धा कमी दाबाचा असते. त्यामुळे फॉल्ट होऊन बीज रात्रभर सुद्धा बंद असते वीज वितरण अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर सांगून सुद्धा काहीही त्यावर उपाय योजना करत नाही. विज नादुरुस्त झाले तर शेतकरी स्वतः डीपी जवळ जाऊन ऑपरेट करतो हे अत्यंत घातक परिस्थिती आहे.
शेतकरी त्यासाठी प्रशिक्षित नाही आणि तो डीपीवर फ्यूज टाकतो काही अपघात घडल्यास याला महावितरणच जबाबदार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एक निवेदन अभियता महावितरण अधिकारी पांढरकवडा, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, आणि तालूका कृषी अधिकारी कृषी विभाग पाढरकवडा यांना निवेदन दिले. यात शेतकऱ्यांनी सांगितले की, या दोन दिवसात वितरण व्यवस्था दुरुस्त नाही झाली तर, आंदोलनाशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही हे त्यांनी सांगितले.
आधीच पीक परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत आहे शेतकरी रात्रभर जागा राहून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात पोहोचतो परंतु विज नसल्यामुळे शेतकरी पाणी देऊ शकत नाही. आणि हे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या शिवाय पर्याय नाही कारण आतापर्यंत सर्व खर्च होऊन गेलेला आहे आणि त्यांनी पाणी नाही दिले तर पीक वाचू शकत नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत महावितरण अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदन देताना संतोष देशटीवार, नितीन बन्तपेलीवार,
अमीर जिवाणी, ज्ञानेश्वर नैताम, मोहन मलेलवार, दिलीप बोमेनवार, प्रकाश शिवणवार, आकाश नाईनवार आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित द्या - शेतकऱ्यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 30, 2023
Rating: