टॉप बातम्या

२५ ऑक्टोबर ला "वखार आपल्या दारी" अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वणी येथे

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यीत स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या "वखार आपल्या दारी" अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा वणी येथील स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वणी वखार केंद्र, (चंद्रपूर रोड) येथे आयोजन करण्यात आल्याचे रंगनाथ स्वामी फार्म प्रोडूस कंपनी लि. वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी माहिती दिली.

सदर कार्यशाळा विनामूल्य असून या कार्यशाळेला सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांना गोदाम उभारणी, गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना याबाबतच्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला १०० शेतकरी संख्येपर्यंत मर्यादित असल्याचे असेही सांगण्यात येत आहे.
 
या कार्यक्रमाची वेळ सकाळी १० वाजता पासून दुपारी ३ पर्यंत असणार आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहून शेतकरी वर्गाने चालू खरीप हंगामात आपले उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने वखार मंडळाच्या गोदामात शेतमाल साठवून बाजार भाव वाढल्यावर शेतमाल विकावा. दरम्यान, गोदामात शेतमाल साठविल्यावर गोदाम भाड्यात ५० टक्के सूट व ९ टक्के दराने तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध आहे. यासाठी वखार महामंडळ आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल. याकरिता प्रक्रिया समजून घेण्याच्या अनुषंगाने दिनांक २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने इतर विभागाच्या योजनेबद्दल सुद्धा मार्गदर्शन होणार असल्याने या कार्यशाळेचा शेतकरी वर्गाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे नागपूर विभागाचे प्रमुख श्री. अजित मासाळ यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.


संपर्क : श्री दीपक बेदरकर विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, 9860869462/9860019462
श्री. स्वप्नील बागडे केंद्र प्रमुख, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वणी केंद्र जिल्हा यवतमाळ 9673527124 
Previous Post Next Post