सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.
रोहित शर्मा एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करतच होता. रोहित शर्माने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीला 6 चौकार आणि 6 षटकारांचा साज होता. रोहित तंबूत परतल्यानंतर अय्यरने केएल राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.
या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचली आहे.
वर्ल्डकपमधील भारताचे पाकिस्तानवरील विजय.
▪️१९९२- भारताचा ४३ धावांनी विजय
▪️१९९६- भारताचा ३९ धावांनी विजय
▪️१९९९- भारताचा ४७ धावांनी विजय
▪️२००३- भारताचा ६ विकेटनी विजय
▪️२०११- भारताचा २९ धावांनी विजय
▪️२०१५- भारताचा ७६ धांनी विजय
▪️२०१९- भारताचा ८९ धावांनी विजय
▪️२०२३- भारताचा ७ विकेटनी विजय
रोहित सेनेने पाकला धू धू धुतले; वर्ल्ड कपमध्ये मिळवला सलग आठवा विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2023
Rating: