८ ऑक्टोबरला कवितेच्या घराचा पुरस्कार वितरण सोहळा व राष्ट्रीय काव्यसंगिती

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कवितेसाठी वाहिलेल्या अभिनव अशा कवितेच्या घराचे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार कवींना प्रदान करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कवी सहभागी होणार आहेत. बापुरावजी पेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी कवितेचे घर, शेगांव ( बुद्रुक ), त. वरोरा, जि चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सकाळी ७.३० वाजता काव्यदिंडी निघणार आहे. या काव्यदिंडीत जि. प. प्राथमिक शाळा, शेगांव
नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव, संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, शेगांव नॅशनल इंग्लिश स्कूल, शेगांव या शाळांचे विद्यार्थी सहभाग घेतील. सकाळी ९.०० वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड कवितेवर बोलू काही या सदरात विद्यार्थ्यांशी काव्यसंवाद साधणार आहेत. सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित असून सोहळ्याचे अध्यक्षस्थान विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व अंमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, सुप्रसिद्ध कवी व मराठी भाषा विभागप्रमुख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील डॉ. पी. विठ्ठल, वर्ध्याचे प्रसिद्ध गझलकार विद्यानंद हाडके, अविनाश मेश्राम पोलिस उपनिरीक्षक, शेगांव उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात बापुरावजी पेटकर काव्यपुरस्कारप्राप्त मान्यवर कवी डॉ. अशोक इंगळे ( अकोला ), अे. के. शेख ( पनवेल ), एकनाथ आव्हाड (मुंबई ), रजनी राठी (अमरावती ), शृंखल खेमराज ( नागपूर ) हे सन्मानित होणार आहेत. तसेच बापुरावजी पेटकर काव्य सन्मानाचे मानकरी
आबासाहेब पाटील ( बेळगाव ), बाळासाहेब लबडे ( गुहागर ) अमोल देशमुख ( परभणी ), गीतेश शिंदे ( ठाणे ), हर्षदा सुंठणकर ( बेळगाव ), मंदाकिनी पाटील ( बदलापूर ), डॉ. अरविंद पाटील ( वर्धा ), प्रशांत खैरे ( गडचांदूर ), डॉ. प्रभाकर लोंढे ( गोंदिया ), नोमेश नारायण ( ब्रम्हपुरी ), वैभव भिवरकर ( कारंजा लाड ), शशिकांत हिंगोणेकर ( जळगाव ), मुकंद वेलेकर ( सोलापूर ), डॉ. श्रद्धा वाशिमकर ( नागपूर ), बापुरावजी पेटकर गझल सन्मानाचे मानकरी डॉ. अविनाश सांगोलेकर ( पुणे ), डॉ. मनोज सोनोने ( काटोल, नागपूर ), सुनंदा पाटील ( ठाणे ), रवींद्र सोनवणे ( पनवेल ), एजाज शेख ( अमरावती ), बापुरावजी पेटकर बालकाव्य सन्मानाचे मानकरी वसुधा वैद्य ( नागपूर ), मंजुषा दरवरे ( चंद्रपूर ), सुजित कदम ( पुणे ), सचिन बेंडभर ( पुणे ) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय काव्यसंगितीचे दोन सत्र आयोजित असून दुपारी १. ३० वाजता पहिल्या कविसंमेलनाचे व गझल मुशायराचे अध्यक्षस्थान रमेश धनावडे (अलिबाग ) हे भुषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंगचित्रकार जयवंत काकडे (वरोरा ), राजन लाखे ( अध्यक्ष, मसाप, पिंपरी चिंचवड ) वैभव धनावडे ( पेण, रायगड) उपस्थित राहतील. या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून 
लालसिंग वैराट ( मुंबई ) शशिकांत पाटणकर ( बदलापूर , संजय पाटील ( ठाणे ), जीविता पाटील (अलिबाग), चित्ररेखा जाधव (नवी मुंबई ), स्मिता शिंदे (बदलापूर ), सीमा पाटील ( मुंबई ), अर्चना गोरे.( पुणे), किसन पेडणेकर ( सिंधुदुर्ग), वेदांती मुणनकर (सिंधुदुर्ग), सुरेश खैरे ( मुंबई), प्रांजली मोहिते (पुणे), स्मिता हर्डीकर ( नवीमुंबई ), कल्पना म्हापुस्कर ( मुंबई), अश्विनी बोलके (पनवेल ), मयूर पालकर (मुंबई ), सोनाली शेंडे ( मुंबई ) विनया सावंत (मुंबई), अश्विनी वराळे (पुणे) प्रतिक धनावडे सहभागी होतील. सूत्रसंचालन राहुल तवटे ( मुंबई ) हे करतील तर आभार धर्मराज लोडे ( शेगांव ) मानतील. दुपारी ३.०० वाजता दुसऱ्या कवीसंमेलन व गझल मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान सुधीर चित्ते (मुंबई ) हे भुषवतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ आव्हाड, (मुंबई ) उपस्थित राहतील. निमंत्रित कवींमध्ये शालिक जिल्हेकर ( नागपूर ) संजय गोडघाटे ( नागपूर ), प्रशांत ढोले ( वर्धा ), प्रकाश बन्सोड ( आर्वी ), माणिक खोब्रागडे ( नागपूर ), प्रदीप देशमुख, (चंद्रपूर ) गीता रायपुरे (चंद्रपूर ), मालती सेमले ( गडचिरोली ), सुनिल बावणे ( चंद्रपूर ), कविता बेदरकर (वर्धा ), प्रिती वाडीभस्मे ( वर्धा ), रत्ना मनवरे ( यवतमाळ ), विजय वाटेकर, (चंद्रपूर ) , गोपाल शिरपुरकर, (चंद्रपूर ), ज्योती चन्ने ( वरोरा ) शेष देउरमले, (चंद्रपूर ) , निरज आत्राम ( आनंदवन ), पंडित लोंढे (वरोरा ), गजानन माद्युसवार ( गडचिरोली ), परमानंद तिराणिक ( आनंदवन ), गौतम राऊत (ब्रम्हपुरी ), सिमा वैद्य ( वरोरा ), आरती लोडे ( वरोरा ), छाया जांभुळे (ब्रम्हपुरी ), मंगेश गोवर्धन ( ब्रम्हपुरी ), रोशनी गणवीर ( नागपूर ), सुषमा कळमकर ( नागपूर ), प्रीतीबाला बोरकर ( नागपूर ), सरलाताई ठमके ( वरोरा ), रजनी संबोधी ( नागपूर ), भारती लखमापुरे ( वरोरा ), जितेश कायरकर ( वरोरा ), अभिजित ठमके ( वरोरा ), राजू मांडवकर ( शेगांव, खुर्द ) कविता सादर करतील. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर ( चंद्रपूर ) हे करतील. तर आभार प्रा. अर्चना लोडे मानतील. समारोपीय कार्यक्रम सायंकाळी ५.०० वाजता प्रा. भालचंद्र लोडे ( शेगांव ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक लोणकर (वरोरा ), सुमेर शेख, अमोल दातारकर ( शेगांव ), नितीन वैद्य ( नागपूर ), डॉ. राकेश बांगडकर ( शेगांव ) उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन डॉ. संदीप भेले (बदलापूर ), तर आभार सूर्यकांत पाटील (वरोरा ) मानतील. या पुरस्कार वितरण सोहळ्याला व राष्ट्रीय काव्यसंगितीला मोठया संख्येने काव्यरसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, (कल्याण ), संकल्पनाकार किशोर पेटकर (नागपूर ) कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, (वर्धा ), कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले ( बदलापूर ), प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील, (वरोरा ) यांनी केले आहे.
८ ऑक्टोबरला कवितेच्या घराचा पुरस्कार वितरण सोहळा व राष्ट्रीय काव्यसंगिती ८ ऑक्टोबरला कवितेच्या घराचा पुरस्कार वितरण सोहळा व राष्ट्रीय काव्यसंगिती Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.