सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
रमेश उर्फ प्रकाश राजा शेट्टी (55) रा. प्रदुर्ग ता. वल्लीपुर जिल्हा पल्लावरम रेल्वेस्टेशन, चेन्नई (तामिळनाडू) असे चोरट्याचे नाव आहे.
मागील सप्टेंबर महिन्यात मारेगाव शहरातील माधव नगर, ओम नगर व अन्य परिसरात पोळा या सणाच्या रात्री पोलीस रेकॉर्ड नुसार तब्बल 14 घरावर सराईत चोरट्यांनी डल्ला मारत घरफोडी केल्या होत्या, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. एकाच रात्री इतक्या घरफोड्या होणे हा चर्चेचा विषय बनला होताच, मात्र पोलिसांसमोर त्या चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आव्हान होते. अशातच, सेम घटना तेलंगणा राज्यातील आसिफाबाद मध्ये घडली. तेथे एका घरी घरफोडी झाली. या घटनेतील आरोपीचे फिंगर फ्रीन्ट च्या आधारे मारेगाव घटनेशी मेळ होत असल्याने त्या हमालाला आसिफाबाद पोलिसांच्या ताब्यातून मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला आणल्यानंतर त्याला घरफोडी कशा केल्या, व यात किती लोकांचा सहभाग आहे याची घटना स्थळावरून माहिती गोळा केली. त्यामुळे आणखी किती चोरट्यांचा सहभाग आहे हे पोलीस चौकशीतून समोर येईलच...
सदर आरोपी वर 510/23 कलम 457,380 अन्वये गुन्हा कायम करण्यात आला असून 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात लाखों रुपयाची लूटमार झाल्याने घरमालकांना आपली आभूषणे, व रोख रक्कम मिळतील अशी आस लागली आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे वणी, यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव, यांच्या मार्गदर्शनाखाली पथक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावन्त, प्रमोद जिद्देवार, दिपक गावंडे, आनंद अचलेवार, अजय वाभीटकर हे काम पाहत आहेत.
पोलिसांना आलेले यश हे कौतुकास्पद आहे. मारेगाव शहरातील घरफोडी प्रकरणातील आरोपीना पकडून घरमालकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ज्यांचा मुद्देमाल चोरी गेला त्यांचा मुद्देमाल त्यांना मिळवून द्यावा, अशी मारेगाव पोलिसांकडून अपेक्षा आहे.-अविनाश लांबटपीडित घरमालक, मारेगाव
मारेगाव पोलिसांना आले यश: घरफोडीतील एका आरोपीला घेतलं ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 12, 2023
Rating: