टॉप बातम्या

13 ऑक्टोबरला फक्त ९९ रुपयांत फिल्म पाहण्याची संधी; असा घ्या लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जर तुम्हाला सिनेमे बघायला आवडत असतील व टीमची सिनेमांचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. १३ ऑक्टोबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. त्यामुळे फुकरे, राणीगंज, जवान सारखे सिनेमे तुम्ही फक्त ९९ रुपयांत पाहू शकता.

 १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून सर्व चित्रपटगृहे ग्राहकांना ९९ रुपयांत सिनेमाची तिकिटे देत आहेत. ही ऑफर देशातील सर्व पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसवर लागू आहे. 

अशा प्रकारे बुक करा तिकिटे
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि PVR, BookMyShow, Paytm इ. सारख्या वेबसाइटवर १३ ऑक्टोबरला तुम्ही तिकिटं रु.९९ मध्ये बुक करू शकता. 

▪️तुमच्या पसंतीच्या सिनेमा नेटवर्कवर जा (उदाहरणार्थ: BookMyShow)
▪️BookMyShow ला भेट द्या
▪️तुमचं शहर निवडा
▪️सर्व तिकिटं भारतात रु.९९ मध्ये उपलब्ध असतील
▪️तारीख आणि वेळ स्लॉट निवडा
▪️पेमेंट पूर्ण करा


Post a Comment

Previous Post Next Post