टॉप बातम्या

आज वणीत प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांचे जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.’’ म्हणूनच मग प्रश्‍न पडतो, ‘गांधी का मरत नाही’...

गांधी जयंती सप्ताहच्या निमित्ताने गांधी विचाराचे प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांचे "गांधी का मरत नाही?" या विषयावर जाहीर व्याख्यान आज 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा. शहरातील स्थानिक शेतकरी मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे.

वणी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धिरज लिंगाडे राहणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार काँग्रेस नेते वामनराव कासावार राहणार आहे.

या कार्यक्रमात आमदार धिरज लिंगाडे यांचा सत्कार केला जाणार आहे. व्याख्यानानंतर आमदार लिंगाडे हे पदवीधर तरुणांशी शिक्षण, नोकरी इत्यादी पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा व प्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या विचारानेच देशाने आणि जगाने पुढे जायला हवे. आज देशात जी परिस्थिती आहे, जी द्वेषभावना देशात रुजवली जात आहे. अशा स्थितीत देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. लोढा यांनी केले आहे.
Previous Post Next Post