जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात दर्शनी भागात रूग्ण हक्क सनदची माहिती लावा : रूस्तम शेख यांची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी व खाजगी रुग्णालयाने रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राइट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णाच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही, या बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काचे सनद खाजगी व सरकारी रुग्णालया मध्ये दर्शनी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये या विषयी आदेश, निर्णय निर्गमित केले आहे. 

कोरोना काळात खाजगी रुग्णालया मधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदिची दखल सरकारने घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश दिले होते. 

रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्णाला प्राप्त असलेला अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्याचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्याचे अहवाल, व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, यासारखे अनेक रुग्ण हक्काचा सदर सनद मध्ये समावेश आहे.

परंतु अजुन पर्यंत बहुसंख्य सर्व नोंदणीकृत सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावण्यात आलेली नाही त्या मुळे रूग्ण त्यांचे हक्क व अधिकार याची माहिती पासुन वंचित आहे.

 रूग्णांना त्यांचे हक्क व अधिकार याची जाणिव व्हावी व त्यांचे आर्थिक शोषण होऊ नये,या उद्देशाने जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात रुग्णाचे हक्क सनद चे फलक रूग्णालयाच्या दर्शनी भागा वर लावण्या संबधी निर्देश द्यावे,अशी मागणी रूस्तम शेख यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात दर्शनी भागात रूग्ण हक्क सनदची माहिती लावा : रूस्तम शेख यांची मागणी जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात दर्शनी भागात रूग्ण हक्क सनदची माहिती लावा : रूस्तम शेख यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.