सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोंडबुरांडा येथील आशा सेविकेची निवड ही अनुसूचित जमाती मधून करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने गट विकास अधिकारी मडावी यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की, गोंडबुरांडा गाव हा पेसा कायद्यात येतात, पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायती मध्ये आदिवासी उमेदवाराला प्रथम प्राध्यान असते. असा पेसा कायदा सांगतो. मात्र, गोंडबुरांडा ग्रामपंचायतीने दिं.5/06/2023 रोजी खोटी ग्रामसभा दाखवून गैर आदिवासी महिलेची नियुक्ती करण्याचे धाडस केले असून 'पेसा' कायद्याचे उलंघनही केले आहे.
तालुक्यातील मौजा गोंडबुरांडा येथील आशा सेविकेची पद हे अनुसूचित जमाती मधून भरण्यात यावे अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जर येथील आशा सेविकेची निवड अनुसूचित जमातीतून करण्यात आली नाही तर या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी सुमित गेडाम, भैय्याजी कनाके व गावातील बहुतांश महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.
आशा सेविकेची निवड अनुसूचित जमातीमधून करा - अ.भा.आ.वि.परिषदेचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2023
Rating:
