सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
मार्डी : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व वणी विधानसभाचे विकासपुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अभिष्टचिंतननिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत वणी उपविभागीय क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 27 सप्टेंबर ला मार्डी येथील स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे पर्यंत करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभाचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार उत्तम निलावाड, भाजपाचे संजय पिंपळशेंडे, ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,भाजप चे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, ठाणेदार जनार्दन खंडेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देठे मॅडम, डॉ.कोडापे, सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धानफुले सर, कृ. उ. बा. समितीचे संचालक अविनाश लांबट यांची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी सेवा पंधरवाडाची भूमिका आमदार बोदकुरवार यांनी विषद केली. शेकडो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत शुगर, बिपी, एचबी, सिकलसेल, गरोदर माता तपासणी, टीबी, कुष्ठरोग, लिव्हर, किडनी, स्त्री रोग सह डेंगू, मलेरियाची तपासणी करवून घेतली. शिबिराचे प्रास्ताविक डॉ.कोडापे यांनी केले.
दरम्यान, शिबिरा करिता भाजप पदाधिकारी बोबडे गुरुजी, मंगेश देशपांडे, प्रसाद ढवस, पवन ढवस, गणेश झाडे, शशिकांत आंबटकर, मारोती तुराणकर, प्रवीण बोथले, सुरेश लांडे, शेखर काळे, यांनी पुढाकार घेतला.
या शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथील डॉ.जुनगरी, डॉ.शेख, वाय.आर.सलामे, आर.डी. रिंगणे, पी.बी.कुरकुटे, पी.बी.पानघाटे, एस.डी.आत्राम, आर. के.मेश्राम, एम.ए.ताजने, बी.डी. आत्राम, पी.ए.अस्वले, एस.के. वानखेडे, एम,डब्ल्यू.कोकुडे, एस.एस. गलाट, एस.एल.चरडे, एस.एम.वर्धे, पी.जी.निकुरे, एम.एम.पाचभाई, जीवन तिरणकर, नितेश आत्राम, अक्षय करसे, रूपा जुमनाके, अस्मिता धोपटे आणि आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.
मार्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2023
Rating:
