टॉप बातम्या

कुंभा येथील मजुराचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मांगली शेत शिवारात एका वृद्धाचा संशयांस्पद मृतदेह आढळून आल्याने एकच उडाली असून, विविध चर्चेला उधाण आले आहे. सदर घटना आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. 
मारोती शेंद्रे (अंदाजे वय 65) रा. कुंभा असे संशयांस्पद आढळून आलेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे. मृतक हे कुंभा येथील रहिवासी असून, ते शेत मजूर असल्याचे बोलल्या जात आहे. ते आज रोजंदारीने बाळू पांढरे यांच्या शेतात काम करित होते, मात्र अचानक त्याचा मृतदेह संशयांस्पद आढळून आल्याने तर्क वितर्क लावले जात असून ही घटना वन्य प्राण्यांनी हल्ला केला की, घातपाती कृत्य तर नाही ना! अशी शंका वर्तविली जात असून या खळबळजनक घटनेने मारेगाव तालुका चांगलाच खळबळ ला आहे, जर का घातपाताचे कृत्य असेल तर तालुक्यातील यंदाची तिसरी घटना घटना असल्याचे आता चर्चील्या जात आहे.
तालुक्यात या पूर्वी जून मध्ये कोसारा येथे एका इसमाचा गेम करण्यात आला होता, त्यानंतर मागील महिन्यात मार्डीत एका तरुणांला सपासप वार करुण संपवन्यात आले होते आणि आता मांगली शेत शिवारात संशयांस्पदरित्या मृतदेह. त्यामुळे विविध चर्चेला पेव फुटले आहे. मारेगाव तालुका क्राईमकडे वाटचाल करित तर नाही ना असेही बोलल्या जात असून,आज सोमवार ला कुंभा येथील एका अंदाजे 65 वर्षीय मारोती शेंद्रे नामक इसमाचा बाळू पांढरे यांच्या मांगली शिवारातील शेताच्या बांधावर रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पुरती खळबळ उडाली आहे. दरम्यान, मजुराचा संशयांस्पदरीत्या मृतदेह घटनास्थळी आढळल्याने त्याची हत्या झाल्याचा कयास आहे. पोलिसांनी पंचनामा करुण मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मारेगाव रुग्णालयामध्ये आणण्यात आला. 
मात्र, पोलिस या घटनेचा अधिक तपास करित असून,सदर घटनेचा नेमका काय प्रकार आहे, याचा उलगडा पोलिस तपासातूनच होणार आहे. तूर्तास तालुक्याच्या कानाकोपऱ्यात याबाबत उलट सुलट चर्चा चर्चील्या जात आहे.
Previous Post Next Post