टॉप बातम्या

विवाहित तरुणाची विष प्राशन करुण आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरी येथील एका विवाहित तरुणाची विष प्राशन करुण आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजता उघडकीस आली.
प्रवीण साईनाथ काळे (अंदाजे वय 32) रा. हिवरी असे विष प्राशन करुण आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. प्रवीण आज सकाळी आपल्या पत्नी सह शेतात फवारणी करण्यासाठी गेला, फवारणी करित असताना पत्नीला गमतीने प्रवीण म्हणाला मी घेऊन पाहू म्हणून, पत्नी म्हणाली की, काही बोलता का जी.. थोड्या वेळात पत्नी पाण्यासाठी त्याच्या पासून काही दूर गेली आणि प्रवीणने चक्क विष गमतीने प्राशन केले. अशी माहिती मृतकाच्या निकटवरतीयांनी दिली. पत्नी परत येताच तो खाली पडून असलेला निदर्शनास आला.या धक्कादायक प्रकारचा पत्नीला चांगला च धक्का बसला आणि हंबरडा फोडला. घटनेची माहिती संबंधितांना देण्यात आली, त्याला तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले मात्र, उपचारादरम्यान मृत्यू त्याचा झाला. या दुःखद घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीणने थट्टा जरी केली असली तरी त्याच्या नेमकं विष घेण्यामागचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सुरु आहे. त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं असा बराच आप्त परिवार आहे.

मात्र मारेगाव तालुक्यात सतत आत्महत्या च्या घटना घडत आहे. तालुका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अशी जनमाणसातून बोलल्या जात आहे.
Previous Post Next Post