टॉप बातम्या

अज आवतन घ्या... उद्या जेवाले या; एक मन कवळा पारबती हरभरा हर हर महादेव!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पोळा किंवा तान्हापोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो.

ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ मात्र पोळ्याच्या एक दिवसा अगोदर निज श्रावणात वाड बैला च्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या बैलाचे खांद शेकतात. याच दिवशी आपल्या आप्तेष्टासह बैलांना घरी गोड धोड करुण खाऊ घालतात.

यावेळी बैलांच्या सदृढ आरोग्यासाठी महादेव भोले शंकराला साकडे घातले जाते. आजच्या दिवसाला मोठ्या भक्तीने भावाने बैलांचे खांद शेकत पूजन करून त्यांना नमस्कार केला जातो. तेव्हा शेतकरी म्हणतो 'अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या' एक मन कवळा पारबती हरभरा हर हर महादेव...

समस्त शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना "सह्याद्री चौफेर" ई पेपर मिडिया प्लॅटफॉर्म तर्फे आजपासून सुरु होणाऱ्या वाडबैल, पोळा आणि तान्हा पोळ्या च्या खूप खूप शुभेच्छा!
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();