सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
मार्डी : आयुष्यमान भव: शिबीराचे आयोजन जि प उ प्राथ. शाळा पहापळ येथे करण्यात आले.या योजनेअंतर्गत लोकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राहुल आत्राम सरपंच, प्रमुख अतिथी एन. टी. चौधरी मुख्याध्यापक, कु. राजश्री तिडके मॅडम आरोग्य अधिकारी उपकेंद्र, सौ.कुमुद बोधे, सौ. छायाताई भैय्याजी कनाके, सौ. पुसदेकर मॅडम आरोग्य सेविका उपकेंद्र पहापळ, सौ. दिपमाला वाघमारे मॅडम पदवीधर शिक्षिका,श्री. बबनरावजी आत्राम, सौ. शारदाताई ठाकरे आशा वर्कर पहापळ,उपस्थित होते.
सदर आयुष्यमान भव: शिबिरात पांढरकवडा, चिंचाळा येथील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी अनेक रुग्णांनी यात सहभाग नोंदविला व आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ येथील पदवीधर शिक्षक श्री. संजय फुलबांधे यांनी तर, प्रास्ताविक सौ. तिडके मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. पुसदेकर मॅडम यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बचत गटाचे अध्यक्ष सचिव तथा सदस्य, शाळेतील शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
आयुष्यमान भव: शिबीर पहापळ येथे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2023
Rating:
