सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : गणेश उत्सव, गौरी, ईद, दुर्गाउत्सव, महालक्ष्मी आदी विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस विभाग, डी बी पथक, वाहतूक पोलीस विभाग, होमगार्ड सर्व एकत्र येत सण उत्सवाच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये करिता आम्ही सज्ज असल्याचे बोलके चित्र पोलीस विभागाकडून वणीकरांना पहावयास मिळाले, शहरातील मुख्य मार्गाने संचालन करीत हा 'फ्लैग मार्च' काढण्यात आला. या निमित्ताने ठाणेदार जाधव यांनी शहरात शांतता राखण्याचे समस्त जनतेला आवाहन केले.
यावेळी वणीकरांचे लक्ष विविध मार्गाने निघालेल्या पोलीस ताफ्याने वेधले.
वणीत पोलिसांनाचा निघाला 'फ्लैग मार्च'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2023
Rating:
