सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
कार्यक्रमाची सुरुवात गावातील मुख्यरस्त्यावरून भजन, वाद्य वृंदाने मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर मिरवणूक प्रार्थना मंदिरात एकत्र जमली व भगवान शंकराचे नंदी पूजन करण्यात आले. प्रसाद वितरण व त्यानंतर नंदीबैलांचे निरीक्षण करत सर्व सहभागी झालेल्या बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्राम.लोकप्रतिनिधी तथा बाजार समितीचे संचालक विजयभाऊ अवताडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन बालगोपालांना व समस्त जनतेला तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, तान्हा पोळा भरवण्याचा एकच उद्देश की, नदी बैल हा शेतीशी संबंधित असल्यामुळे बाळगोपालांना शेतीचे महत्व व शेती करण्याची ओढ भविष्यात निर्माण व्हावी हाच एकमेव असल्याचे मत श्री अवताडे यांनी व्यक्त केले.
यावेळी गणेश बुरडकर, अनिल बोधे, अंबादास चहानकर, राजूभाऊ बुरडकर, भास्करराव बोकडे, निलेश गाडगे, आशिष गानफाडे, प्रवीण रोगे, नितीन निखाडे, विठ्ठल सोनेकर, रामू सोमलकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप खेकारे, अरुण गांजरे, प्रल्हाद कोयचाडे, चरणदास कोयचाडे, अशोक येडमे, सूर्यभान आडे, प्रशांत मत्ते, शंकर बोढे, प्रफुल कोल्हे, विजय बोन्डे,आदींचे मोलाचे योगदान लाभले, तसेच या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी तान्हा पोळ्याना भरभरून प्रतिसाद देत सहकार्य केले. या निमित्त देवाळा येथे तान्हा पोळ्याची मुहूर्तवेढ रोवण्यात आली.
देवाळा येथे तान्हा पोळा उत्सहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2023
Rating:
