सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
माध्यमामध्ये आज जे काही राजकीय वातावरण सुरू असले तरी तालुक्यात काँग्रेस भक्कमपणे मजबूत आहे. कोणामुळे काँग्रेसला वाईट किंवा चांगल्या दिवसाचे संबंध येत नाही. शेवटी काँग्रेसचे विचार आणि एकनिष्ठा जपणारे कार्यकर्ते असल्यामुळेच पक्ष मोठा झाला आहे. त्यामुळे काही गोष्टी कडे दुर्लक्ष करण्यातच आपले हित, इथे सर्वसामान्य जनता काँग्रेस च्या पाठीशी आहेच, हे विचार त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. तर अनिकेत धाबेकर, रमेश डोहे (ग्रा. पं सदस्य), धनराज धोबे यांनी काँग्रेस मध्ये स्वेच्छा प्रवेश घेतला. समाजाला पक्षाला आपल्या सारख्या तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केली व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
या भेट प्रसंगी काँग्रेस नेते वामनराव कासावार, माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे, वसंत जिनींग अध्यक्ष आशिष खुलसंगे, सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, युनूस शेख (बॉम्बेवाला), विजय धानोरकर, जगदीश काटवले, प्रफुल क्षीरसागर तसेच युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष आकाश बदकी, शहर अध्यक्ष सय्यद समिर, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष शाहरुख शेख, यादव काळे, यादव पांडे, अरविंद वखानोर, पांडुरंग लोहे (माजी अध्यक्ष ख.वि.सं.मारेगाव), तुळशीराम कुमरे, रविराज चंदनखेडे (सरपंच), प्रफुल विखणकर (उपसरपंच), सुरज पंडिले, पद्माकर गाडगे, जनार्दन गाडगे, प्रकाश पिदूरकर, विनोद आत्राम, बबन काकडे, मंगेश उईके, हनुमान जुमनाके, निलेश रासेकर (सरपंच), धनंजय आसुटकर, कमलाकर कल्लेवार, नारायण मांदाळे, उत्तम दातारकर, विजय बोथले, मुन्ना ठाकरे, विठ्ठल डुकरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी सर्वांनी पक्षात राहून पक्षाला मोठं करण्यासाठी जो कोणी मेहनत घेत आहे, त्यांना पक्ष कधीच विसरत नाही, विसरणार पण नाही. मात्र,पक्षाच्या हिताच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्यांना पक्षात अजिबात थारा नाही आणि कधी दिलाही जाणार नाही असे पक्षाचे धोरणच असल्याचे, माजी आमदार वामनराव कासावार यांनी उपस्थित सर्वांना सूचित केले. काँग्रेस पक्षासाठी सर्वांनी एक दिलाने लढण्यासाठी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी जि प अध्यक्ष वेणूताई काटवले यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व शुभेच्छा
काँग्रेसच्या महिला जेष्ठ नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष वेणूताई काटवले यांच्या वाढदिवसाचे निमित्त त्यांना त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या छोटेखानी कार्यक्रमातून वेणूताई यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी आग्रही इच्छा उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
मारेगाव काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार वामनराव कासावार यांची सदिच्छा भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2023
Rating:
