टॉप बातम्या

पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अविरोध


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष बोरेले व उपसभापती प्रेम राठोड यांनी दिं १८ आगस्ट रोजी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते,त्याच्या रिक्त झालेल्या जागेकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी शुक्रवार दिं.१ सप्टेंबर रोजी पार पडली. यात १८ संचालकातून मतदानाद्वारे ही निवडणूक होणार होती.परंतु,सभापती व उपसभापती पदासाठी एक-एकच नामांकन पत्र दाखल झाल्यामुळे सभापती पदी बिशनसिंग नानकसिंग शिंदो तर उपसभापती पदी गंगारेड्डी पोतन्ना क्यातमवार यांची अविरोध निवड झाली.

आज १ सप्टेंबर रोजी १८ संचालकातून ही निवडणूक होणार होती परंतु १८ संचालकांपैकी १५ संचालक हे हजर होते.एक संचालक उशिरा पोहचले तर २ संचालक संतोष बोरले आणि निलेश मंचलवार हे गैरहजर होते. पांढरकवडा बाजार समितीमध्ये मोघे- पारेवकर - खेतानी हे तिन गट सक्रीय आहे.हे तिन्ही गट एकत्रीत असल्याने सभापती, उपसभापतीची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदासाठी काँग्रेसचे बिशनसिंग शिंदो व उपसभापती पदासाठी गंगारेड्डी क्यातमवार यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा आर.बि.निनावे, अध्याशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,यांनी केली,ही निवडणूक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.
Previous Post Next Post