टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यात आठ तासाऐवजी बारा तास कृषीला विद्युत पुरवठा द्या - हिवरी येथील ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा असलेला हिरवेगार पिक पाण्याच्या अभावामुळे सुखत चाललेला आहे. अशा परिस्थिती मध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार करुन कृषीची लाईन आठ तासाऐवजी बारा तास देण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन हिवरी येथील ग्रामस्थांनी अभियंता (मराविविक) मारेगाव यांना देण्यात आले. 

तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून मान्सूनने मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे खरीपातील कापुस, तुर व सोयाबिन या पिकांची पाण्याअभावी नुकसान होण्याच्या मार्गवर आहेत. मारेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग हा फक्त शेतीवरच अवलंबुन असुन, त्यांचे उजीविका शेतातील उत्पन्न यावर आहे. परिणामी शेतातील संपुर्ण पिकांचे पाण्याअभावी माल वाळत चालला असताना शेतकऱ्यांजवळ शेतीशिवाय जगण्याकरीता इतर दुसरे कोणतेही साधन नसल्याने शेतातील पिकांच्या ओलीताकरीता मुबलक पाण्याची आवश्यकता आजघडीला आवश्यक आहे. त्यासाठी वीज पुरवठा हा तोकडा सुरु आहेत. कधी येतो कधी जातो, पाहिजे तसा विद्युत पुरवठा मिळत नाही. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तूर्तास पाणीअभावी शेत माल हातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सतत च्या अतिवृष्टी, नापिकीने तालुक्यात आत्महत्याचा आलेख वाढत आहे, परिणामी प्रशासनाने आठ तासा ऐवजी बारा तास वीज पुरवठा देण्यात यावे तसेच पुढील दोन महीन्याकरीता ही लाईन (विद्युत) देण्यात यावी. या मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी अभियंता शाखा मारेगाव यांना चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. 

निवेदन देतांना गुणवंता देरकर, गोपाल सोमलकर, प्रशांत काकडे, रामापाटिल झाडे, विनोद घोसले, संतोष पवार, महादेव पवार यासह अनेक शेतकरी व गावकरी उपस्थित होते. 


Previous Post Next Post