सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहार
मारेगाव : शेतकऱ्याचा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा' किन्हाळा येथे मोठ्या उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील किन्हाळा येथे बळीराजाच्या मदतीला सदैव तत्पर राहुन त्याच्या कष्ठात महत्वाचा भागीदार असलेल्या सर्जा राजा चा सण म्हणजे पोळा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा केला. देवस्थान कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पोळा हर्रास या नावीन्यपुर्ण उपक्रमामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ही वर्षी हर्रास करण्यात आलेला पोळा प्रगतिशील शेतकरी आत्माराम रामभाऊ गिरसावळे यांनी घेतला त्याबद्दल त्यांचा सरपंच शुभम भोयर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष रतन आत्राम, उपाध्यक्ष आत्माराम गिरसावळे, प्रशांत तोरे, भास्कर कपाळकर, धिरज डांगाले, मुकुंद आडे, पुष्पराज गाणफाडे,विशाल सोमटकर, नितेश भोयर, मनोज आसेकर, मोहन गायधन, अनंता काथवटे, प्रवीण देठे, प्रवीण काकडे, सागर खडसे, सुनील सोमटकर, राहुल भोयर, राजू शास्त्रकार, हितेश गायधन, योगेश काथवटे , राज चौधरी व समस्त किन्हाळा गावकरी उपस्थित होते.
किन्हाळा येथे पोळा मोठ्या उत्साहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 15, 2023
Rating:
