सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
विशेष म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी 'मारबत आणि बडग्या' या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपूर, महाराष्ट्रात काढली जाते. ‘घेऊन जा गे.. मारबत’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली. इंग्रजांच्या राजवटीत लोक अत्याचार सहन करत होते. त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून मारबत काढली.ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी त्यांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध काळी पिवळी चळवळ सुरू केली.
मारबत उत्सव हा गणेशोत्सवापेक्षा जुना सण म्हणून पाहिला जातो. प्राचीन काळी अनेक प्रथा होत्या. त्या पारंपारिक परंपरा मानवजातीसाठी घातक असल्याने त्या नष्ट करण्यासाठीही हा सण साजरा केला जातो. मारबत सण साजरा करण्यामागे एक उद्देश आहे. म्हणजे वाईट परंपरा आणि अंधश्रद्धा जाळून चांगल्या परंपरा आणि कल्पनांचे स्वागत करणे आहे. घेऊन जा गे.. मारबत; फक्त नागपुरातच साजरा होणारा अनोखा मारबत उत्सव आज मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात ही साजरा करण्यात येतो.
घेऊन जा गे...मारबत!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 15, 2023
Rating:
