सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : मुंबई पुण्यानंतर आज वणी शहरात प्रथमच दुपारी 2 वाजेपासून शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ 'मनसे दहिहंडी उत्सव' थेट नागरिकांना पहायला मिळणार आहे. यासाठी मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळींची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यामुळे मनसेच्या 41 फुटांचा दहीहंडीचा थरार सर्व वणीकरांना अनुभवायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवाला जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त दहिहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसेच्या वतीने वणी शहरात प्रथमच आज दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ 'दहिहंडी' च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे थेट थरार नागरिकांना उपस्थित राहून पहायला मिळणार आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या दिलखेचक अदाने या दहीहंडी कार्यक्रमाला चार चांद लागणार आहे. अद्यावत साउंड सिस्टीम, त्यामुळे मनसे दहीहंडी उत्सव आणखीनच जल्लोषात होणार आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोविंदा पथक वणीत दाखल होणार असून 41 फुट उंच दहीहंडीचा थरार, दोन लाखांच्या वर बक्षीसांची भव्य लूट, अशा भव्यदिव्य दहीहंडीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले असून वणी उपविभागातील नागरिकांना प्रथमच थेट पहायला मिळणार आहे. त्यामुळे मनसेद्वारा आयोजित लक्षवेधी त्या गगनचुंबी दहीहंडीची उत्सुकता साहजिकच आता शिगेला पोहचली आहे.
आज मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी वणीत येणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2023
Rating:
