आज मारेगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात विद्यार्थी गुणगौरव सोहळा  जनहित कल्याण संघटना, युवाक्रांती संघटना व पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आज दि.15 ऑगस्टला होणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

मारेगाव येथे दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात तालुक्यातील प्रत्येक शाळेमधील इयत्ता 10 वी तसेच इयत्ता 12 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांती युवा संघटना वणीचे अध्यक्ष श्री. राकेश खुराणा, उदघाटक श्री. डॉ. मनिष मस्की, नगराध्यक्ष न. पं. मारेगाव,प्रमुख अतिथीमध्ये गौरीशंकर खुराणा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव, श्री. उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, श्री. पद्माकर मडावी, गटविकास अधिकारी मारेगाव, श्री. जनार्धन खंडेराव, पोलीस निरीक्षक मारेगाव, शंकर हटकर, वनपरीक्षेत्र अधिकारी, मारेगाव, श्री. सुनील निकाळजे, तालुका कृषी अधिकारी मारेगाव,श्री. स्नेहदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी मारेगाव, श्री. शैलेशकुमार पाटील, अभियंता, विद्युत महावितरण मारेगाव, समीर कुळमेथे, अध्यक्ष, जनहित कल्याण संघटना मारेगाव, रॉयल सय्यद, निलेश तेलंग, कविताताई मडावी, अध्यक्षा जनहित कल्याण महिला संघटना, सुवर्णाताई खामणकर सचिव तसेच श्री. भास्कर धानफुले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ख्यातनाम मार्गदर्शक, मराठी भाषा प्रमाणलेखन करणारे, पी. एच. डी. प्रबंधाचे मुद्रित शोधन तसेच पत्रकारिता क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री. दीपक रंगारी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यवतमाळच्या महिला जिल्हाध्यक्षा मा. सुनयना संजय येवतकर हे दोन्ही मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे.

या गुणगौरव सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भविष्यात कामी पडेल असे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला युवकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघटना ता. मारेगाव यांचेकडून करण्यात येत आहे.


आज मारेगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज मारेगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.