टॉप बातम्या

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पिढी समृद्ध भवितव्य घडवेल- प्रा.डॉ.करमसिंग राजपूत


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर वाचनाचीही गोडी पालकांनी मुलांना लावावी,पालकांनी स्वतःचा चैनीचा किंवा गरजेचा वस्तू एकवेळ नाही घेतले तरी चालेल त्याऐवजी स्वत: त्याच पैश्याने जर घरी नवनवीन पुस्तके आणून ठेवाल तर घरातील मुले ते पुस्तके वाचतीलच आणि अश्या प्रकारे जर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पिढी समृद्ध भवितव्य घडवेल,असे प्रतिपादन लो.टि. महाविद्यालयाचे अर्थशास्त्र प्रमुख प्रा.डॉ.करमसिंग राजपूत यांनी वसंत जिनिंग येथे मादगी बहुउददेशीय संस्था, वणीच्या वतीने (दि.6.ऑगस्ट) रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. 
सोहळ्याचे उद्घाटन प्रा.सुनिल मिद्दे (महासचिव महासंघ, (M4) यांच्या हस्ते झाले. उद्घाटन भाषणात समाजाचा विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यासक्रमात गरजू विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत महासंघाचा माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासनही केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार) हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून ,"विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रम व जिद्द बाळगल्यास बिकट परिस्थितीवरही सहजपणे मात करता येते असे प्रतिपादन केले." व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष महासंघ,(M4), विठ्ठल शंकावार (जेष्ठ समाजसेवक), व्यकंटी अंधेवार, प्रदिप आधारे (उपाध्यक्ष M4), BMS अध्यक्ष निलेश परगंटीवार, संस्थेचे सचिव सुरज चाटे, सहसचिव रवी कोमलवार, दिपक गुल्लमवार, जी.आर.रेड्डी, कोषाध्यक्ष नत्थु नगराळे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात 10 वी व 12 वी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच इतर विविध प्रकारच्या परिक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तालावार व अजय कंडेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन अरुण अरुण एनपल्लिवार यांनी केले. या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सुरज चाटे,रवि कोमलवार,राकेश शंकावार, किशोर मंथनवार,विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, रितिक मामिडवार, रितिक बेलेवार, नागेश मोहूर्ले, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, मनिष वालकोंडे, मोरेश्वर कुंटलवार, कैलास पौन्नलवार व आदी समाजबांधवांनी केले.
Previous Post Next Post