वणी पोलिसांनी दुचाकी चोरट्याला पुण्यातून केली अटक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : दुचाकी चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला गजानन मधुकर जाधव रा. मोहर्ली याला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातून अटक केली. त्याला आज (18 ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, फिर्यादी मनीष पुरुषोत्तम वयं 32 रा. जैन ले आउट (वणी) यांनी दि.25/04/2023 रोजी पो.स्टे. वणी येथे तक्रार दिली की, ते वापरत असलेली त्यांची लाल काळया रंगाची पेशन प्रो. मोटार सायकल क्रमांक एम एच 34 वाय 7279 ही दुचाकी दि. 23/04/2023 रोजी सायं. 5.30 वाजताचे दरम्यान ते गांधी चौक वणी येथील फेमस टेलरचे दुकानासमोर उभी असलेली मोटर सायकल चोरीला गेली. याबाबत त्यांनी तक्रार पोलिसात दिली होती. 

सदर गुन्याचे तपासात चोरी गेलेली मोटार सायकल नामे हसन शेख शफी (वय 30) रा. कायर याचेकडे मिळुन आल्याने त्याला विचारपुस केले असता त्याने मोटर सायकल हि अर्जुन तांदुरकर रा. मोहली यांचे कडून 9000/- रुपयात विकत घेतली असल्याचे सांगीतले. अर्जुन तांदुरकर रा. मोहर्ली यास विचारपुस केले असता त्याने सांगितले की, मोटार सायकल ही त्याच्या गावातील गजानन मधुकर जाधव, रा. मोहर्ली याचे कडुन 45000/- रूपयात विकत घेतले असल्याचे सांगितलं. त्यामुळे पोलिस चांगलेच बुचकाळ्यात पडले. पोलिसांनी गजानन मधुकर जाधव
याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो मनमाड, येवला,
नाशिक, पुणे येथे भटकंती करीत होता. चार महिन्यांपासून तो पोलीसांना हुलकावणी देत फिरत होता असे समजते. 

डीबी पथक प्रमुख सपोनि शिंदे यांना सदर गुन्हयातील मुख्य आरोपी गजानन मधुकर जाधव (रा. मोहुर्ली) हा पुणे जिल्ह्यातील तालुका हवेली लोणी काळभोर येथे असल्याची मिळालेल्या माहिती. त्या आधारे गजानन ला लोणी काळभोर (जि. पुणे) येथे जावुन ताब्यात घेत नमूद तक्रारी संबंधाने विचारपुस केली असता त्याचा गुन्हयात सहभाग दिसला. त्याला नमूद गुन्हयात अटक करून कोर्टाने दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने त्याला 21 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, हरिन्द्र कुमार भारती, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.



 
Previous Post Next Post