पाऊस सुट्टीवरून परतला...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

* अपेक्षित श्रावण सरींची शक्यता २१ ऑगस्टपासून असताना त्याअगोदरच म्हणजे शनिवारपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

* गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी विदर्भ-मराठवाड्यातील काही भागांत पावसाने सुमारे पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली.
* २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी राहील.
* सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जोर ओसरला असला तरी नाशिक व पुणे शहर, पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.
* यंदाचा हा १९७२ च्या नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खंड आहे.
* अशी माहिती माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
Previous Post Next Post