सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
यवतमाळ : जाणीव एक हात मदतीचा संस्थेचे सर्पमित्र पवन दळवी व सहकारी मीत्र स्वप्निल भुजाडे यांनी तब्बल एकाच दिवशी दहा सापांना जीवदान दिले. एवढ्या गजबजलेल्या वस्तीत साप येतात. पवन दळवी यांनी आतापर्यंत हजार हून सापांना सुरशित रित्या रेस्क्यु करून निसर्ग मुक्त केले आहे. आज सकाळ पासून 3 विषारी व 7 बिनविषारी सापांना पिंपळगाव, गिरिजा नगर, धनश्री नगर, ढोले ले आऊट अशा वेगवेगळ्या ऐरियातुन सापांना सुरशित रित्या रेस्क्यू करून व लोकांमध्ये सापांनविषयी असलेली अंधश्रद्धा व जनजागृती करून सापांना न मारता जवळच्या सर्पमित्राला बोलवून सापांचे जीव वाचवा सांगण्यात आले. आज रेस्क्यू करण्यात आलेल्या सापामध्ये विषारी एक मण्यार (common create) दोन नाग (spectacle cobra) बिनविषारी दोन धामण (rate snake) दोन दिवड/धोंड्या (cricket killback snake) एक कवड्या (Comman wolf snake) एक रूखई (Bronzeback Tree Snake) एक तस्कर (common trinket snake) हा सर्व सापांना चौसाळा वनपरिक्षेत्रा मध्ये निसर्ग मुक्त करण्यात आले त्यावेळेस संस्थेचे सर्पमित्र पवन दळवी, स्वप्निल भुजाडे, धीरज वाघाडे, अजय वर्मा, उपस्थित होते.
जाणीव एक हात मदतीचा संस्थेने एकाच दिवशी दहा सापांना दिले जीवदान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2023
Rating:
