कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त टी डी आर एफ द्वारा "एक जवान, एक वृक्ष" या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त टी डी आर एफ द्वारा "एक जवान,एक वृक्ष" हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व टी डी आर एफ अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपणाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले.
या उपक्रमाच्या माध्यमातून वणी तालुक्यातील टी डी आर एफ जवानांनी टी डी आर एफ संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात गव्हरमेंट हायस्कूल परिसरात व निरगुडा नदी विविध ठिकाणी वड, पिंपळ, कडूनिंब, निंबु, सीताफळ, इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून टी डी आर एफ (TDRF) जनसंपर्क अभिषेक राजहंस कार्यरत होते.
सोबतच टी डी आर एफ (TDRF) मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, कंपनी कमांडर गणेश बुरांडे,वितेश वंजारी,अस्मिता वाळके,काजल वाळके,
सुमित जुमनाके,वैभव मडावी,साहिल लोखंडे,क्रिशना येमुरले, आदित्य दूर्गमवार,अनुष्का नक्षने,सिया झिलटे,प्रगती परचाके, प्रेरणा कामत्वार, खुशी ताजने, नम्रता सोनेकार इ. जवानांनी विशेष कार्य केले. या उपक्रमाला गव्हरमेंट हायस्कूल चे मुख्याध्यापक खान सर उपस्थित होते.
कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त टी डी आर एफ द्वारा "एक जवान, एक वृक्ष" या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 03, 2023
Rating:
