मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने मारेगाव तालुक्यातील 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि.31 जुलै 2023 रोजी येथील शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.श्री.न्याय. निलेश वासाडे न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायलाय, मारेगाव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे राहणार आहे. या सोहळ्याचे उदघाट्न वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को. आप्रेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर विजय चोरडिया करणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके पहापळ, हे राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, जनार्दन खंडेराव, ठाणेदार मारेगाव, पद्माकर मडावी बिडीओ, मारेगाव, शंकर हटकर वन परीक्षेत्राधिकारी, मारेगाव, सुनील निकाळजे तालुका कृषी अधिकारी, मारेगाव, नरेंद्र कांडुरवार गट शिक्षणाधिकारी, मारेगाव, प्रा. हेमंत चौधरी, शैलेंद्रकुमार पाटील अभियंता विद्युत मारेगाव, अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी, मारेगाव, दिपक कळमणकर, विस्तार अधिकारी, म. बा.कल्याण मारेगाव, पुंडलिक काका साठे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हे करणार आहे. 
गुणगौरव समितीने प्रथमच एक चांगला भारतीय नागरिक घडावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे,यासाठी विद्यार्थी गुणगौरव घेण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा मिळावी असा 
 गुणगौरव समितीचा मानस आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील "विशेष कार्य गौरव" सुद्धा करण्यात येत आहे. या सोहळ्याला तालुक्यातील सर्व विद्यार्थी,पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा तातेड यांनी केले आहे.
मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 29, 2023 Rating: 5
Powered by Blogger.