सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सामाजिक विकास योजनेअंतर्गत मारेगाव नगरपंचायतसाठी ६१ लाखाचा निधी मंजूर झाला असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाला पुस्तके आणि फर्निचर साठी नगरसेवक शंकर मडाविंनी शासनदरबारी नेहमीच पाठपुरावा केला. त्याची प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश दिनांक १७ जुलै २०२३ रोजी प्राप्त झाले. शंकरावांच्या प्रयत्नातून तब्बल ६१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला.
केवळ निधी मंजूर करून घेण्यावर नगरसेवक शंकर मडावी थांबल्या नाहीत तर त्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नगरसेवक मडाविंनी प्रशासकीय मान्यता करून घेतली. मारेगाव शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सर्व सोयीसुविधा पूर्ण अशी सुसज्ज ग्रंथालयाची प्रभाग क्रमांक १७ यमध्ये तयार आहे. स्वीकृत नगरसेवक शंकर मडावी
यांच्या प्रयत्नातून मारेगाव तालुक्यासाठी सामाजिक विकास योजनेमधून नगरपंचायतला भरगोस निधी वाट्याला आला..!
तसेच येणाऱ्या काळात मारेगाव शहरात बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहासाठी लवकरच निधी प्राप्त होणार आहे. त्याकरिता नगरपंचायत कडून जागा सुद्धा प्राप्त झाली असून यापुढेही अजून मोठ्या प्रमाणात शासनाकडून विविध योजेनेतून निधी तालुक्यासाठी आणला जाईल असे, नगरसेवक तथा काँग्रेस अध्यक्ष शहर शंकर मडावी यांनी सांगितले.
मारेगाव नगरपंचायतला ६१ लाखांचा निधी..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2023
Rating:
