सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
संततधार पावसाने कालव्याचे विसर्ग होऊन अनेकांच्या घरात शिरले. या भागात जुलैच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, घरात पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी वाढलेले आहेत. या भागातील पावसाळी व बेंबळा प्रकल्प कालव्याचे वाहिन्या रामेश्वर गावाच्या दिशेने वळविल्याने, कालव्याचे वारंवार पाणी गावात घरात शिरून अतोनात नुकसान होत असल्याचे तक्रारी येथील नुकसान ग्रस्त तथा नागरिकांच्या आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना सुचना व लेखी पाठपुरावा करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोपी स्थानिक गावाकऱ्यांनी केला असून, मोठे नुकसान होत असल्याची ग्रामसमस्या सरपंचा निलिमा थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत तहसीलदार निलावाड यांना निवेदनातून मांडली.
परिसरात अनेक वर्षापासून बेंबळा प्रकल्पाचे कामे होत आहेत, पण एकही पावसाळा असे नाही की, घरात शेतात पाणी शिरले नाही. त्यामुळे पिकांचे व घरातील आवश्यक वस्तुचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकरी, तथा मोल मजुरी करणाऱ्या नुकसानग्रस्ताच्या होत असलेल्या नुकसानीचे निवारण तातडीने करावे अशी आग्रही मागणी गट ग्रामपंचायत सिंदी,महागांव व रामेश्वर येथील सरपंचा सौ थेरे यांचे मार्गदर्शनात ग्रामस्थांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच अविनाश भाऊ लांबट, आशिष खंडाळकर, चंद्रशेखर थेरे, विनोद चहानकर, चंद्रभान बेसेकर, राजू लांडे, संजय देवाळकर, मारोती उरकुडे, दिलीप ताजणे, विनोद एकरे, प्रफुल उरकुडे, प्रफुल पाटील आदींची उपस्थिती होती.
बेंबळा कालव्याच्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2023
Rating:
