शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा, पैसे आले नसतील तर 'या' ठिकाणी साधा संपर्क...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे व यांनी पंतप्रधान किसन सन्मानिधीचा 14 वा हप्ता जारी केला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही असे तपासा...
 रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला संदेश तपासा- पीएम किसानचा चौदावा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेला मोबाईल नंबर वर खात्यात आलेले दोन हजार रुपये हस्तांतरित केल्याचा संदेश आलेला असेल तो तपासणे गरजेचे आहे.

खाते बॅलन्स तपासा- समजा तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकतात. परंतु बऱ्याच कालावधीनंतर देखील संदेश आला नाहीतर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक करू शकतात. तसेच बँकेत जाऊन पासबुक मध्ये एन्ट्री करून देखील तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले की नाही हे तुम्ही तपासू शकतात.

नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तपासा- जर तुम्ही नेट बँकिंग ची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाली की नाही हे नेट बँकिंग च्या साह्याने ऑनलाईन देखील तपासू शकतात. तसेच तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबर वर देखील मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकतात.

तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा...!

जर बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही खालील पी एम किसान हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

➢ पी.एम. किसान टोलफ्री नंबर- 18001155266

➢ पी.एम. किसान नवीन हेल्पलाइन- 011-2430060

➢ पी.एम.किसान लँडलाईन नंबर- 011-23381092, 23382401

➢ पी.एम. किसान हेल्पलाइन नंबर- 155261


शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा, पैसे आले नसतील तर 'या' ठिकाणी साधा संपर्क... शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा, पैसे आले नसतील तर 'या' ठिकाणी साधा संपर्क... Reviewed by सह्याद्री चौफेर on July 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.