डोल डोंगरगाव व वनोजा देवी येथील अवैध दारू विक्री बंद करा - स्थानिक महिलांची निवेदनातून मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : डोलडोंगरगांव गावातील महिला सह पुरुषांनी उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी (वनोजा देवी) यांच्या नेतृत्वाखाली व डोल डोंगरगाव सरपंचा शीतल येरमे यांच्या पुढाकारातून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी. यासाठी मारेगाव पोलीस स्टेशन कार्यालयावर धडक दिली. मागील अनेक वर्षापासून गावाच्या काही अंतरावर असलेल्या पारधी बेडा परिसरात तथा वनोजा देवी गावात अवैध दारू विक्री सुरु आहे. याबाबत स्थानिक महिलांनी दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही वर्षीपासून देवीच्या परिसरात तथा वनोजा येथे अवैध दारू विक्री सुरु आहे. याबाबत अनेकदा निवेदन, बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र, याचा काहीच उपयोग झाले नसल्याचे संताप व्यक्त होत आहे. दारू मुळे महिलांच्या संसारात कलह निर्माण झाले असून भांडण तंटे दिवसेंदिवस होत आहे. तरुण युवक दारूच्या आहारी जात आहे. महिलांना नाहक त्रास या दारुड्यांचा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही गावातील अवैध दारू बंद करण्यात यावी,याबाबतचे निवेदन मारेगाव पोलिसात देण्यात आले. मच्छिन्द्रा, लाखापूर येथीलही अवैध दारू विक्री विरोधात मागील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, अद्यापही या परिसरातील अवैध दारू विक्री बंद झाली नसून दारूबंदी का झाली नाही? याचा जाब विचारण्यासाठी उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी पुन्हा स्मरण पत्र दिले आहे. दारू विक्रेत्याच्या मुजोरीमुळे कंटाळलेल्या डोल डोंगरगावातील असंख्य महिला, पुरुष आणि युवकांनी गावातील दारूबंदी विरुद्ध आज दिनांक २१ जुलै रोज शुक्रवार एल्गार पुकारला.
काल दुपारच्या सुमारास महिला, पुरुष व युवकांचा "मोर्चा" मारेगाव पोलीस स्टेशन वर येऊन धडकला.
महीलांनी पोलीस प्रशासनाला तथा तहसील कार्यालयाला आग्रही मागणी लावून धरली असून, अवैध दारू विक्री करणाऱ्याला व पेट्या मालाचा पाठपुरावा करणाऱ्या वर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशीही मागणी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून महिलांनी केली आहे.

कायद्याचा धाक आणि पोलिसांचा वचक नसल्याने अवैध दारू विक्री फोफावली अशा आरोप उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी व निवेदनकर्ते महिला यांनी केला आहे. संपूर्ण गावातील वातावरण या अवैध दारुविक्री मुळे खराब झाले असून स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य,पोलीस पाटील यांचे कार्य याबाबत फेल ठरत असल्याचा सुर नागरिकांतून उमटत आहे. आता नवीन ठाणेदार आले,त्यामुळे त्यांचे कडून आम्हाला न्याय मिळेल अशी स्थानिक पदाधिकारी आशा धरून आहेत.
वनोजा देवी तथा डोलडोंगरगाव येथील महिला पुरुष यांनी गावात जे अवैधरीत्या दारू विक्री करतात,त्यांच्यावर कारवाई तसेच दारू पुरवठा करतात त्यांचेवर सुद्धा योग्य ती कारवाई करा. असे पोलीसांना यावेळी सांगितले. निवेदन देताना सरपंचा शितल येरमे, प्रशांतकुमार भंडारी उपसरपंच (वनोजा देवी), बेबी पवार, जिजाबाई भोसले, रेखा पवार, शुभांगी पवार, सोनू भोसले, सुनंदा शेरकुरे, मंगला भोसले, इंदुताई तोडासे, तानेबाई टेकाम, उषा भोसले, श्रीहरी लेनगुरे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष रामभाऊ लेनगुरे, पोलीस पाटील योगेश बोडणे, संतोष पवार, लक्ष्मण भोसले, नरेंद्र गुरनुले, मुरलीधर तोडासे, चिंतामण भोसले, मारोती पवार, व विनोद भोसले आदींची उपस्थिती होती. 

डोल डोंगरगाव व वनोजा देवी येथील अवैध दारू विक्री बंद करा - स्थानिक महिलांची निवेदनातून मागणी डोल डोंगरगाव व वनोजा देवी येथील अवैध दारू विक्री बंद करा - स्थानिक महिलांची निवेदनातून मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.