सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किन्हाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संततधार,मुसळधार पावसाचे पाणी घुसून शाळा तुंबली. त्यामुळे शाळेत पाणी की पाण्यात शाळा अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती, येथील युवा कर्तव्यदक्ष सरपंच शुभम भोयर यांनी आपल्या चमुंना सोबत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांची वाट मोकळी करून दिली आहे.
काल रात्रीपासून सर्वत्र सुरु असलेल्या जोरदार पावसाने नदी नाले तुंबलेले असून शेत शिवारातील पावसाचे वाहते पाणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात घुसले, या पाण्यासोबत गाळांचा थरही जमा झाले,असे चित्र असताना सरपंचांनी पुढाकार घेऊन जेसीबी मशिनच्या साहाय्याने शाळेच्या आवारातील तुंबलेले पावसाचे पाणी नालीद्वारे काढुन शाळा सह विद्यार्थ्यांना वाट मोकळी करून दिलासा दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस पुन्हा चार दिवसाचा मुक्काम ठोकणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पहिल्याच झालेल्या जोरदार पावसाची पुनःरावृत्ती होऊ नये यासाठी सरपंच भोयर यांनी तात्काळ जेसीबी मशीन च्या साहाय्याने नाली खोदून घेतली आणि भविष्यातील उद्भवणारी समस्या कायमची मिटवली आहे. यासाठी सरपंच भोयर यांनी धिरज डांगाले, भास्कर कपाळकर, प्रवीण देठे, विशाल सोमटकर, अनंता काथवटे, सतीश धोटे, प्रवीण काकडे, राजु शास्त्रकार, पुष्पराज गाणफाडे, अनंता आसेकर, राहुल गाणफाडे, गुणवंत येरमे, नितेश भोयर व समस्त गावकरी यांच्या लाभलेल्या विशेष सहकार्याचे आभार मानले.
किन्हाळा गांव व जिल्हा परिषदेची शाळा अगदी मारेगाव-मार्डी रोडवर आहे. गेल्या तीन चार महिन्याअगोदर संबंधित विभागाकडून किन्हाळा गावाच्या रस्त्याचे काही अंतराचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रोडचे नूतनीकरण केले. परंतु रस्त्याच्या बाजूला नाल्या काढल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी जायला मार्गच नसल्याने पाणी सरळ शाळेत, गावात घुसतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत असे सरपंच शुभम भोयर यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले आहे. तसेच कालपासून तालुक्यात संततधार, मुसळधार पाऊस सुरु आहे, सर्वत्र नदी नाले तुंबून वाहत आहे त्यामुळे शालेय विदयार्थ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी मी स्वतः मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचेशी संपर्क साधून मारेगाव तालुक्यातील शाळा, महाविद्यालय सुट्टी बाबत चर्चा करून मागणी केली आणि त्यांनी आज शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली. त्यामुळे मी शुभम भोयर (सरपंच, किन्हाळा) त्यांचे शतशः आपल्या माध्यमातून आभार मानतो...!!
सरपंचांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना करून दिली वाट मोकळी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 21, 2023
Rating:
