सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २२ जुलै २०२३ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याअनुषांगाने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असून उद्या शनिवार दि. २२ जुलै रोजी एक दिवसाकरिता शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार बुधवार दि.१९ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. तसेच काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संततधार मुसळधार झालेला असून पुलावरून पाणी जावून बहुतांश रस्ते बंद झालेले आहे. करिता पुर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, विद्यार्थी पुरात अडकू नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मा जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार उद्या शनिवार दि.२२ जुलै २०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,महाविद्यालय शाळा एक दिवसासाठी (नियोजित परीक्षा वगळता) बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे.
उद्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 21, 2023
Rating:
