अंगणवाडी इमारती मध्ये शिरले पुराचे पाणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : एकात्मिक महिला व बाल कल्याण प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या मार्डी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ च्या इमारती मध्ये मुसळधार पाऊस आलेल्या पुराचे पाणी शिरल्यामुळे शासनातर्फे दिला जाणारा चिमुकल्यांचा पोषण आहार ओला चिंब झाला असून काही कालावधी साठी केंद्र बंद करावे लागले आहे.

काल रात्रीपासून सर्वत्र सुरु असलेल्या जोरदार पावसाने नदी नाले तुंबले आहे. शिवारात पाणी च पाणी असून या पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहत्या पाण्यासोबत गाळांचा थर तथा विषारी जन्य प्राणी इमारतीच्या आत शिरल्यामुळे चिमुकल्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन काही कालावधीसाठी अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याची पाळी आली आहे. या घुसलेल्या पाण्याने चिमुकल्यांचा आहार खराब झाला असून, खराब आहार खाण्या अयोग्य झाला आहे.

सतत पाऊस सुरु असून हा पाऊस पुन्हा चार दिवसाचा मुक्काम ठोकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले असल्यामुळे त्याची पुनःरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
अंगणवाडी इमारती मध्ये शिरले पुराचे पाणी अंगणवाडी इमारती मध्ये शिरले पुराचे पाणी  Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.