युवासेनातर्फे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओचा जाहीर निषेध


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओचा गुरुवार 20 जून रोजी युवासेनेद्वारे निषेध करण्यात आला. सदर आंदोलन हे वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 3 वाजता करण्यात आले. या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला शेण व चपलेचा नैवेद्य देण्यात आला.  

 भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होताच त्याबाबत पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून किरीट सोमय्या बाबत सर्व स्तरावरून प्रचंड विरोध दर्शविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणीतील युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी 20 जुलै रोजी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला चप्पलाचा हार घालून व शेण मारून निषेध दर्शविण्यात आला.  
आंदोलन करतेवेळी प्रथमेश कोहळे, मंगल भोंगळे, किशोर ठाकरे, महादेव खीरटकर, शैलेश धोटे, आकाश पेंदोर, प्रफुल बोर्डे, चेतन उलमाले, कशिब शेख, मोहिन शेख, अक्षय पथाडे, प्रविण मांडवकर, आदित्य सातपुते, महेश कोहले, पंकज दुमोरे, करण पचारे, सुरज मडावी, प्रफुल कोल्हे, चेतन मालेकर व बहुसंख्येने युवा शिवसैनिक उपस्थित होते.

युवासेनातर्फे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओचा जाहीर निषेध युवासेनातर्फे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओचा जाहीर निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.