सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मागील तीन महिन्यापासून दोन समुदायामध्ये प्रचंड हिंसा चालू असून हिंसेने आता उग्ररुप धारण केले आहे. यात महिलांवर अत्याचार करून त्यांची विवस्त्र करून धिंड काढल्या जात आहे. एवढेच नाही तर त्यांचा अमानुष छळ केल्या जात आहे. काही ठिकाणी तर महिला व पुरुष्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि शांतता भंग झाल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र मणिपूर राज्य धगधगत आहे. हा प्रकार प्रचंड गंभीर असून देखील केंद्र व राज्य सरकार यावर मुंग गिळून गप्प बसले आहे.
लोकशाहीतील हा निंदनीय प्रकार काळिमा फासणारा असून यावर नियंत्रण आणण्यासाठी तेथील सरकार सफसेल फेल,निष्क्रिय ठरत आहे. अशा सरकारला तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे. तसेच त्या घटनेच्या हिंसेमागील "मास्टर माईंड" शोधून त्यांना सरळ सरळ फासावर चढवावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
देशात सातत्याने एस सी, एस टी वर समाजावर आघात हल्ले होत असून सरकार अशा घटनांवर आळा घालण्यासाठी असमर्थ दिसत आहे, याचे ताजे उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील पाथरी (रुंजा) येथे दि. २१ जुलै २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. ह्या घटनेच्या संबंधित आरोपी अजूनही पकडण्यात आले नाही. यातील आरोपींचा तात्काळ शोध लावण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी व आरोपीना ताब्यात घेऊन त्यांवेवर सक्त कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात व महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा अर्चना कांबळे, वैशाली गायकवाड, शहराध्यक्ष किशोर मुन यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रवीण वनकर, अर्चना नगराळे, नरेंद्र लोणारे, किर्ती लभाने, राहुल कुंभारे, ऍड. सारिका चालखुरे, वैशाली पाटील, भारत कुमरे, शंकर रामटेके, तुळसा नगराळे, सुजाता भगत, पुष्पा पेटकर, पुष्पा लोहकरे, वंदना पळवेकर, सुचिता प्राणिता ठमके, दादाजी घडले, सुभाष परचाके, नंदनी ठमके, शुभांगी नगराळे, अर्चना वनकर, गंगाधर रामटेके, रामदास पळवेकर, गौतम पखाले, प्रीती करमनकर, सोनाली निमसटकर, वंदना ठाकरे, शुभांगी डोंगरे, मेघा बोंडे, वर्षा गोवरदीपे, माधुरी कांबळे, प्रतिमा लांजेवार, अंजु पासवान, ताई डोंगरे, शिळा नळे, चंदन पळवेकर, पुष्पलता बांदाडे, अन्नपूर्णा दुर्वे, सुचिता जंगले, सुकेशनी मुनेश्वर, माया भगत, यांच्यासह असंख्य वंचित व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा - वंचितचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2023
Rating:
